मुजफ्फपूर कारागृहामध्ये छापेमारी, ब्रजेश ठाकूरजवळ भेटली अनेक कागदपत्रे

मुजफ्फपूर – बिहार राज्यात 15 आॅगस्टच्या आधी प्रत्येक वर्षी कारागृहामध्ये छापेमारी टाकण्यात येते. शनिवारी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कारागृहामध्ये छापेमारी टाकण्यात आली. मात्र यावेळेस छापेमारी दरम्यान एक चकीत करणारी गोष्ट समोर आली.

मुजफ्फपूर जिल्हा कारागृहामध्ये जेव्हा जिल्हाधिकारी आणि एसपी छापा टाकण्यासाठी गेले तेव्हा बालिकागृह बलात्कार घटनेतील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर हा मुलाखत गृहातील भागात दिसला. त्यानंतर त्याच्याजवळून अनेक कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये दोन पाने सापडली असून त्यावर जवळजवळ चाळीस लोकांची नावे आणि मोबाईल क्रमांक लिहलेले आढळले आहेत. ज्यामध्ये अनेक प्रभावी लोकांची नावे आढळली आहेत. त्यामध्ये एका मंत्र्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक देखील सापडला आहे.

-Ads-

दरम्यान ,याशिवाय आणखी काही कागदपत्रं देखील मिळाली आहेत.  ही सर्व कागदपत्रं जप्त करून सील करण्यात आली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)