लाऊडस्पिकरच्या वादातून तरुणास बेदम मारहाण

राहुरी विद्यापीठ –  येथे ईद मिलाद उत्सवात लाऊडस्पिकर बंद करण्याची मागणी धुडकावून लावल्याने वसिम रहिमखान पठाण या तरुणास बेदम मारहाण करीत हातावर तसेच छातीवर ब्लेडने वार करून गंभीर जखमी करण्याची घटना घडली.
शहरातील खाटीक गल्ली येथे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. ईद मिलाद सण साजरा करण्यासाठी खाटीक गल्ली येथील तरूणांनी लाऊडस्पिकर लावला होता. यावेळी सवेरा बेकरीचा मालक जिया याने लाऊडस्पीकर बंद करण्याचे सांगितल्याने वादाला तोंड फुटले.

यावेळी वसिम रहिमखान पठाण या तरूणाने ईदचा सण असल्याने लाऊडस्पीकर लावलेला असल्याचे सांगितले. या रागातून सवेरा बेकरीचा मालक जिया याने वसिम यास बेदम मारहाण करीत हातावर तसेच छातीवर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

-Ads-

जखमी वसीमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वसिम पठाण याने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी सवेरा बेकरीचा मालक जिया याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भाबड करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)