राहुरी पोलिसांची कामगिरी : 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

राहुरी – नगर- मनमाड महामार्गावर राहुरी शहरात गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक करताना जामखेड येथील दोघांना पोलिसांनी केली. त्यांच्याकडून जवळपास 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 15 ऑगस्टच्या दिवशी सायंकाळी 5-30 च्या सुमारास महामार्गावर ग्रीन हॉटेल समोर आबूजर सादिक कुरेशी वय 36 रा. (जामखेड, खर्डा रोड) व जावेद शेख (पूर्ण नाव माहीत नाही) रा. जामखेड हे आपल्या ताब्यातील टेम्पो क्रमांक एम. एच. 12 इक्‍यू 9174 मध्ये 3 बैल व 8 जर्सी गायी दाटीवाटीने कोंबवून त्यांना क्रुरतेची वागणूक देत वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना वाहतूक करीत असताना मिळून आला.

यासंदर्भात पोलीस हवालदार आयूब लालमहंमद शेख यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा सन 1960 चे कलम 11 (1) (ड) व महाराष्ट्र प्राणीरक्षक कायदा (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5 (ब) व मोटार वाहन कायदा कलम 83 (1) 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी. बी. जाधव पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)