भाजपकडून राहुल यांच्या उत्पन्नाचा मुद्दा उपस्थित 

नवी दिल्ली – भाजपने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्पन्न वाढीवरून लक्ष्य केले आहे. राहुल यांच्याकडे दाखवण्यासाठी कुठलाही उत्पन्नाचा स्त्रोत नसतानाही त्यांच्या उत्पन्नात दहा वर्षांत झालेल्या वाढीबाबत भाजपने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

संबंधित मुद्दा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. राहुल यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांनुसार त्यांचे उत्पन्न 2004 मध्ये 55 लाख रूपये होते. ते 2009 मध्ये 2 कोटी रूपये तर 2014 मध्ये 9 कोटी रूपयांवर पोहचले. केवळ खासदार असणाऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नात एवढी वाढ कशी काय होते? खासदाराचे उत्पन्न आम्हाला माहीत आहे. उत्पन्नाचा कुठलाही स्त्रोत नसताना राहुल यांच्या विकासाचे मॉडेल कोणते आहे, अशा प्रश्‍नांची सरबत्ती प्रसाद यांनी केली. 2जी स्पेक्‍ट्रम वाटप घोटाळ्याशी संबंधित युनिटेककडून राहुल यांनी दोन मालमत्ता विकत घेतल्या का, असा सवालही त्यांनी विचारला. दरम्यान, भाजपने केलेल्या टीकेवर कॉंग्रेसकडून तातडीने कुठले प्रत्युत्तर देण्यात आले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)