एचएएल कंपनीच्या कामगारांची राहुल यांनी घेतली भेट 

राफेल व्यवहारात कंपनीवर मोदी सरकारने घाला घातल्याचा केला आरोप 

बंगळुरू –
राफेल विमाने तयार करण्याचे कंत्राट हिंदुस्थान एरोनाटिक्‍स लि या सरकारी मालकीच्या कंपनीला मिळायला हवे होते. पण मोदी सरकारने हे कंत्राट अनिल अंबानी यांच्या कंपनीला देऊन या कंपनीच्या हितावरच घाला घातला आहे असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.देशाच्या संरक्षणाची बाजू भक्कम करण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स कंपनीने मोलाचे योगदान दिले आहे आता मोदी सरकारने त्यांच्या हितावर घाला घातल्याने कंपनीच्या बाजूने ताकद उभी करण्यासाठी आपण येथे आलो आहोत असे राहुल गांधी यांनी आज कंपनीच्या कामगारांपुढे बोलताना सांगितले. बंगळुरू येथील कंपनीच्या बाहेर त्यांनी तेथील कामगारांशी चर्चा केली.
यावेळी त्यांनी मोदी सरकारवर या व्यवहारावरून पुन्हा जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की केवळ मोदींच्या आग्रहावरूनच फ्रांसच्या दसॉल्ट या राफेल विमाने तयार करणाऱ्या कंपनीने अनिल अंबानी यांच्या कंपनीशी करार केला.

मोदी सरकारकडूनच अंबानी यांच्या कंपनीचा आग्रह धरण्यात आला होता याचे अनेक पुरावे समोर आले आहेत असेही त्यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले. हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लि ही कंपनी भारताची मालमत्ता आहे. भारताच्या हवाई क्षेत्राचे ही कंपनी भविष्य आहे. त्यांच्याकडून राफेलचे काम काढून घेऊन मोदी सरकारने या सरकारी मालकीच्या कंपनीचे नुकसानच केले आहे असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)