निर्मला सीतारामन यांच्यावरील आरोपांबाबत राहुल ठाम

दुबई: मागील आठवड्यात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांच्या बाबत जे वक्तव्य केले होते त्यावर ते अद्यापही ठाम आहेत असे त्यांनी आज येथे स्पष्ट केले. ते म्हणाले की त्यांच्या जागी दुसरा कोणी एखादा पुरूष असला असता तरी आपण हेच विधान केले असते असे ते म्हणाले. ते येथे एका पत्रकार परिषदेत म्हणाले की राफेल प्रकरणात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांना मोदींनी स्वता संसदेत उपस्थित राहून उत्तरे देणे अपेक्षित होते.

या विधानाचे समर्थन करताना त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की आपण केलेले वक्तव्य योग्य आहे. पंतप्रधान मोदींनी अनिल अंबानी यांना राफेल प्रकरणात तीस हजार कोटी रूपयांची चोरी करण्यात मदत केली आहे. आणि त्या प्रकरणात उपस्थित झालेल्या प्रश्‍नांना त्यांनी स्वता संसदेत उपस्थित राहुन उत्तरे द्यायला हवी होती पण त्यांनी तेथून पळ काढला आणि आपला बचाव करण्याची जबादारी त्यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या महिला आहेत म्हणून त्यांनी एका महिलेच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला असा आपला आरोप होता. त्यांच्या ऐवजी दुसरा एखाद पुरूष मंत्री असला असता तरी आपण हाच आरोप केला असता असेही त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)