राहुल-सोनिया गांधी यांनी 5 वर्षात एकही प्रश्‍न विचारला नाही.- लोकसभा अहवाल 

नवी दिल्ली – सोळाव्या लोकसभेतील विविध पक्षांच्या नेत्यांची सक्रियता आणि सदनात त्यांनी मांडलेले मुद्दे या बाबतीतील अहवाल सदनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आला. संसदीय कामकाजासंबंधित पार्लमेंटरी बिझीनेस डॉट कॉम द्वारा बुधवारी जारी केलेल्या या अहवालात अनेक मनोरंजक तथ्ये उघड झाली आहेत.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संपूर्ण पाच वर्षांच्या काळात एकही प्रश्‍न विचारला नसल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याप्रमाणेच भाजपाचे लालकृष्ण आडवाणी, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, माजी पंतप्रधान एचडी देवगौडा, आणि शत्रुघ्न सिन्हा यांनीही एकही प्रश्‍न विचारलेला नसल्याचे दिसून आले आहे. प्रश्‍न विचारण्याच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, विजयसिंह मोहिते पाटील आणि धनंजय महाडीक सर्वात आघाडीवर आहेत. संसदेतील 93 टक्के सदस्यांनी मिळून गेल्या पाच वर्षात 1.42 लाखापेक्षा अधिक प्रश्‍न विचारले. त्यातही 171 सदस्यांनी सर्वाधिक प्रश्‍न शेतकरी आत्महत्यांबाबत विचारल्याचे दिसून आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कालावधीत संसदेच्या कामकाजात 65 हजारपेक्षा अधिक वेळा व्यत्यय आला आणि 500 पेक्षा अधिक कामकाजाचे तास वाया गेले. सर्वाधिक कामकाज अर्थसंकल्प अधिवेशनात आणि सर्वात कमी कामकाज हिवाळी अधिवेशनात झाले.
सदनात उपस्थितीबाबत भाजपाचे भैरोप्रसाद मिश्र, आणि बिजू जनता दलाचे कुलमणी सामल यांची उपस्थिती 100 टक्के असल्याचे आढळून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)