मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत राहुल यांनी उडवली खिल्ली

मिशन शक्तीच्या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओचे केले अभिनंदन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने अंतरीक्षातील उपग्रहावर क्षेपणास्त्र मारा करण्याच्या तंत्राची यशस्वी चाचणी केल्याची जी घोषणा केली त्यावर त्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. पण या मिशन शक्तीच्या यशस्वी चाचणीबद्दल त्यांनी डीआरडीओच्या वैज्ञानिकांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे.

त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की डीआरडीओने अत्यंत अभिमानस्पद कामगीरी केली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्याचवेळी पंतप्रधान नोदींनाही आपण जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत आहोत अशी खोचक टिपण्णीही त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)