राहुल गांधींकडून मोदींची फिरकी! मोदींना दिल्या जागतिक रंगमंच दिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली: देशामध्ये सार्वत्रीक निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने देशभरामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विराधकांकडून आपापल्या पक्षांचा जोरदार प्रचार सुरु असून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी राजकीय नेते मंडळी सोडत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान राहुल गांधींनी मोदींची फिरकी घेतली आहे.

भारताने आज मिशन शक्तीच्या माध्यमातून शत्रूराष्ट्राचे अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडण्याचे तंत्रज्ञान भरताकडेही असल्याचा पुरावा जगासमोर मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेडिओ, टीव्ही आणि सोशल माध्यमांव्दारे ही माहिती दिली.

याबाबत प्रतिक्रीया देताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारताच्या या यशाबाबत संरक्षण संशोधन व विकास विभाग अर्थात डीआरडीओचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदींची फिरकी देखील घेतली. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर राहुल गांधी लीहतात, “डीआरडीओ आपण बजावलेल्या कामगिरीवर अभिमान वाटतो. याचबरोबर पंतप्रधानांना जागतीक रंगमंच दिनाच्या शुभेच्छा.”

आपल्या ट्विटद्वारे राहुल गांधी यांनी पंतप्रधान मादींवर अप्रत्यक्षरीत्या नाटकीपणाची टीका केली असल्याने आता भाजपकडून कशाप्रकारे उत्तर देण्यात येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1110818665585360896

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)