राफेलवरून राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर कडवट टीका

नवी दिल्ली: राफेल विमान खरेदीच्या व्यवहारावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. संसदेतील राफेलची खुल्या पुस्तकावरील परीक्षा सोडून पंतप्रधान पळून गेले असावेत. त्याऐवजी ते पंजाबमधील विद्यार्थ्यांना धडे शिकवत असावेत, अशी जळजळीत टीका राहुल गांधी यांनी केली. कालच राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये पंतप्रधानांना राफेल विषयी चर्चेचे आवाहन केले होते.

राहुल गांधी यांनी राफेल व्यवहाराविषयीचे चार प्रश्‍न ट्‌विटरवर उपस्थित केले आणि त्याची उत्तरे पंतप्रधानांनी द्यावीत, अशी मागणीही केली. मात्र आज ही खुल्या पुस्तकावरील परीक्षा सोडून पंतप्रधान पळून गेले असावेत, अशी टीका राहुल यांनी केली. पंजाबमधील लव्हली विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसमोर पंतप्रधानांचे भाषण होणार आहे. तेथील विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना या प्रश्‍नांचीउत्तरे विचारावीत, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हवाई दलासाठी 126 विमानांची आवश्‍यकता असताना 36 विमानांचा व्यवहार का झाला ? प्रत्येक विमानासाठी 560 कोटींऐवजी 1,600 कोटी रुपये का मोजायला लागले ? हिंदुस्थान एरोनॉटिकऐवजी ऑगस्टा वेस्टलॅन्डची निवड का झाली ? असे प्रश्‍न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. याशिवाय माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर राफेलची फाईल आपल्या बेडरूममध्ये ठेवतात ? त्या फाईलमध्ये आहे तरी काय ? असा नवीन प्रश्‍नही राहुल गांधी यांनी ट्‌विटरवर उपस्थित केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)