राफेल करार : राहुल गांधी यांनी ट्विट करत जेटलींना मागितले उत्तर 

नवी दिल्ली – राफेल करार या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापत चालले आहे. काँग्रेसने या मुद्यावरून मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. दिल्लीमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्ता काँग्रेस मुख्यालय ते पीएम निवासस्थानापर्यत मोर्चा काढत आहेत. दरम्यान पीएम निवासस्थानी पोहचण्याच्या आधीच त्यांना रोखण्याचे प्रयत्न चालू आहेत.

राफेल कराराची चौकशी ही संयुक्त संसदीय समितीव्दारे करण्यास सरकार तयार आहे की नाही ?, यावर राहुल गांधी यांनी बुधवारी अरूण जेटलींना २४ तासात उत्तर मागितले होते. यानंतर यासंबंधी आज गुरूवारी दुपारी १२ च्या दरम्यान ‘ट्विट’ करत अरूण जेटली यांना आठवण करून देत म्हटले आहे की, ‘आता फक्त ६ तास उरले आहेत. संयुक्त संसदीय समितीव्दारे चौकशीस सरकार तयार आहे की नाही याची भारतीय तरूण वाट पहात आहेत’.

बुधवारी अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी राफेल करारा संबंधी काँग्रेसवर आरोप केले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)