नवी दिल्ली – भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आज एम्स रूग्णलयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मागच्या दोन महिन्यांपासून ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. वयाच्या ९३ वर्षी त्यांनी एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.ते म्हणाले, ‘आज भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना लाखो लोकांचं प्रेम आणि आदर मिळाला होता. त्यांच्या कुटुंब आणि समर्थकाप्रती मी सांत्वन व्यक्त करतो. ते कायम आमच्या स्मरणात राहतील’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)