राहुल गांधी दक्षिण भारतातूनही लढणार?

वंदना बर्वे
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन ठिकाणाहून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा जोरात आहे. यूपीच्या अमेठीव्यतिरिक्त दक्षिण भारतातील एखाद्या मतदारसंघाची निवड केली जावू शकते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंधरा वर्षांपासून अमेठीचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये दोन ठिकाणाहून निवडणूक लढविली होती.

यामुळे राहुल गांधी यांनी सुध्दा यावेळी दोन ठिकाणाहून निवडणूक लढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. दुसरी जागा दक्षिण भारतातील असेल अशी चर्चा आहे. यापूर्वी, नांदेडमधून लढणार असल्याची चर्चा होती. यामागचा तर्क असा की, राहुल गांधी ज्या ठिकाणाहून लढतील त्याला लागून असलेल्या मतदारसंघातही कॉंग्रेसला फायदा होवू शकतो. कॉंग्रेस उत्तर भारतात थोडी कमजोर आहे. अशात, दक्षिण भारतातून लढल्यास त्याची भरपाई होवू शकते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)