राजस्थानात राहुल यांनी फोडला कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ

जयपूर -राजस्थानमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. आज येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकप्रकारे त्या निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

राहुल यांनी राफेल विमान खरेदी करारावरून मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा थेट आरोप केला. त्या करारांतर्गत कंत्राट मिळवून देऊन मोदींनी उद्योजक मित्र अनिल अंबानी यांच्यावर मेहेरनजर केली. केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार असताना फ्रान्सशी राफेल खरेदी करार करण्यासाठी पाऊले उचलली गेली. मात्र, आताच्या सरकारने निश्‍चित केलेल्या करारानुसार राफेल विमानाची किंमत तब्बल तिप्पट झाली आहे. राफेल विमानांची निर्मिती परदेशात करण्याचे ठरले आहे. त्यामुळे अभियंत्यांसह तरूण भारतीयांच्या रोजगार संधी हिरावल्या गेल्या आहेत, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत आणि चीनची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. मात्र, चीनमध्ये दर 24 तासांत 50 हजार रोजगार उपलब्ध होतात. तर भारतात दररोज केवळ 450 तरूणांना रोजगार मिळतो. भारतीय तरूण अधिक प्रामाणिक आणि सक्षम असूनही त्यांना रोजगाराच्या कमी संधी मिळणे ही बाब लाजिरवाणी आहे, असे त्यांनी म्हटले. यावेळी राहुल यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि महिलांच्या सुरक्षेवरूनही मोदी सरकारवर निशाणा साधला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)