पित्रोदांच्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट करावी : अमित शहा

file photo

नवी दिल्ली – सॅम पित्रोदा यांनी पुलवामा हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानवर करण्यात आलेली कारवाई या विषयी जे वक्तव्य केले आहे त्यावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहे. विरोधी पक्षांनी शहीद सैनिकांचा अवमान केला असून त्यांनी आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवरही प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की विरोधकांनी नेहमीच मतपेटीचे राजकारण केले असून तुष्टीकरणाच्या भूमिकेतच ते कायम राहिले आहेत. पण आपण राष्ट्रीय सुरक्षेपेक्षाहीं मोठे आहोत काय हे राहुूल गांधी यांनी स्पष्ट करावे. ज्या सैनिकांनी प्राणांची आहुती दिली त्या सैनिकांविषयी आणि कुटुंबियांविषयी असे राजकारण करणे योग्य आहे काय असा सवाल त्यांनी केला आहे. पित्रोदा यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्या विषयी शंका व्यक्त करून शहीद सैनिकांचा अवमान केला आहे त्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही अमित शहा यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रसने पित्रोदा यांच्या विधानापासून स्वताला दूर ठेवले आहे. ती विधाने पित्रोदा यांची व्यक्तिगत विधाने आहेत त्याच्याशी कॉंग्रेसचा काही एक संबंध नाही असे स्पष्टीकरण कॉंग्रेसने या आधीच दिले आहे पण नुसते एवढे स्पष्टीकरण चालणार नाहीं तर राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे असेही शहा यांनी म्हटले आहे. देशात घडलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा काही संबंध नसतो असे कॉंग्रेसला म्हणायचे आहे काय हे कॉंग्रेसने स्पष्ट करावे अशी मागणीही शहा यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)