राहुल गांधी यांनी विदेशात देशाची प्रतिष्ठा जपावी : भाजप

बलिया: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विदेशात बोलताना देशाची प्रतिष्ठा जपावी, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्‍ते शाहनवाझ हुसैन यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी दुबईमधील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनिल अंबानी यांना देशाचे 30 हजार कोटी रुपये चोरण्यास मदत करत असल्याचा आरोप केला होता. त्या संदर्भाने हुसैन यांनी गांधी यांच्यावर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल प्रकरणात स्वतःचा बचाव करण्यासाठी लोकसभेमध्ये एका महिलेला पुढे केले, या आरोपाचा राहुल गांधी यांनी पुनरुच्चारही केला होता. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्याबाबत ते बोलत होते. भाजपच्या राज्यात भारत गेल्या चार वर्षात असहिष्णू बनला आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेली टीका आणि देश असहिष्णू बनल्याची टीका असभ्यपणाची आहे, असे शाहनवाझ हुसैन म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विदेशामध्ये देशाला असहिष्णू संबोधणे दुर्दैवी आहे. विदेशात एका राजकीय पक्षाच्या नेत्याविरोधात बोलत नाहीत. तर पंतप्रधानांबाबत बोलत आहेत, हे राहुल गांधी यांनी लक्षात ठेवावे. त्यांच्या वक्‍तव्यामुळे भारतीयांच्याच भावना दुखावतील, असेही हुसैन म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)