राहुल गांधींनी माफी मागावी : अमित शाह

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्याने लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असताना राजकीय उलथापालथ देखील सुरू झाली आहे. अशातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या प्रचार सभेदरम्यान राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमाचल प्रदेशातील कांगरा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुलवामा येथील केंद्रीय राखीव सुरक्षा दलांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर टीका करीत अमित शाह यांनी म्हटले की, ”राहुल गांधींना कुठल्या प्रश्नांची उत्तरे हवी? असे प्रश्न उपस्थित करणे म्हणजे भारतीय वायु सेनेवर संशय करणे होय एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने भारतीय वायुसेनेवर संशय करणे चुकीचे आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी यासाठी भारतातील जनतेची तसेच शहिदांच्या कुटुंबियांची आणि सेनेची माफी मागणे आवश्यक आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)