आरएसएसच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींनी आरोप फेटाळले !

मुंबई – गौरी लंकेश हत्या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांनंतर त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आपल्यावरील आरोप मान्य नाहीत, असे राहुल गांधींनी न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या हमीवर त्यांचा जामीन मंजूर केला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांवरही आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला. मुंबईतील काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड हे राहुल गांधींसाठी जामीन राहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)