राहुल गांधी हे शेखचिल्ली : मनेका गांधी

नवी दिल्ली – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तसेच केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मनेका गांधी यांना राहुल गांधी यांनी घोषित केलेल्या किमान उत्पन्न हमी योजने बाबत विचारले असता त्यांनी “आपण शेखचिल्लीने केलेल्या घोषणांबाबत काहीही बोलणार नाही” असे वक्तव्य केले.

दरम्यान, भाजपतर्फे काल लोकसभा निवडणुकांसाठी घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये मनेका गांधी यांना सुलतानपूर मतदारसंघ देण्यात आला आहे तर त्यांचे पुत्र वरून गांधी यांना पिलीभीत मतदार संघ देण्यात आला आहे. तत्पूर्वी 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये वरुण गांधी यांनी सुलतानपूर तर मनेका गांधी यांनी पिलीभीत मतदारसंघातून विजय मिळवला होता मात्र मनेका गांधी यांच्या विरोधात पिलिभित मतदारसंघातील चार आमदारांनी उघड बंड केल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींनी मनेका गांधी आणि वरुण गांधी यांच्या या मतदारसंघांमध्ये अदलाबदल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)