करुणानिधी यांच्या निधनाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले दुःख

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद पाच वेळा भूषवलेल्या एम करुणानिधी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. करुणानिधी यांच्या निधनाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले आहे. करुणानिधी यांच्या निधनाबाबत ट्विट करताना राहुल गांधी यांनी “गेल्या सहा दशकापासून तामिळ राजकारणावर आपला प्रभाव कायम ठेवणाऱ्या करुणानिधींच्या निधनामुळे दुखी झालो असून आज भारत मातेने आपला एक वीर पुत्र गमावला आहे. अशा दुःखद प्रसंगी आपण करुणानिधी यांच्या कुटुंबियांच्या व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य भारतीयांच्या दुःखामध्ये सामील आहोत” असा संदेश दिला आहे.

दरम्यान तामिळनाडूचे माजी एम करुणानिधी यांची प्राणज्योत आज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी मावळली.  प्रदीर्घ आजारापणा मुळे करुणानिधी यांना मागील काही दिवसांपासून चेन्नई येथील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)