पुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधी नृत्य करत होते -भाजप

नवी दिल्ली – पुलवामा हल्ल्यावरून भारतात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हल्ल्यावरून आता राजकारणाला सुरूवात झाली आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. 14 फेब्रुवारी रोजी आपले 40 जवान शहीद झाले. यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी कॉबेट पार्कमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. जगभरात असा पंतप्रधान आहे का?, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

#PulwamaAttack : जवानांवर हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदी शूटिंगमध्ये व्यस्त – काँग्रेस

त्यानंतर आता भाजपकडून राहुल गांधी यांचा एक फोटो व्हायरल करण्यात आला आहे. त्या फोटोमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी एका लोकनृत्यात सहभागी झाल्याचं दिसत आहे. त्यावर भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे.

भाजपचे आयटीसेल प्रमुख अमित मालवीय यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून काँग्रेसने 19 फेब्रुवारी रोजी केलेल्या एका ट्विटचा फोटो व्हायरल केला आहे. यामध्ये राहुल गांधी गुजरातमधल्या बलसाड इथं काँग्रेसच्या जनआक्रोश रॅलीमध्ये लोकनृत्यात सहभागी झाले असल्याचे म्हटले आहे. नंतर ते ट्विट काँग्रेसने डिलीट करण्यात आलं होतं. नेमकं हेच ट्विट व्हायरल करण्यात आलं असून हा फोटो का डिलीट करण्यात आला ? असा सवाल अमित मालवीय यांनी केला आहे.

पुलवामा हल्ल्याचं राजकरण करू नये असं आवाहन सर्वच स्तरातून करण्यात येत होतं मात्र त्यानंतरही काही दिवसातच राजकारणला सुरूवात झाल्याच दिसत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)