केरळमधील पूरग्रस्तांप्रती राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या संवेदना

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना गरजू लोकांना मदत करण्याचे आव्हान केले.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, केरळमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार घातला आहे. यामुळे मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांना बेघर व्हावे लागत आहे. मी केरळच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आव्हान करतो की, त्यांनी पुढे येत गरजू लोकांना मदत करा.पुढे त्यांनी म्हटले की, अशा कठीण परिस्थितीच्या वेळी माझ्या संवेदना केरळमधील लोकांच्या सोबत आहे.

-Ads-

दरम्यान केरळमध्ये बुधवार पासून मुसळधार पाऊस पडत आहे. आणि भूस्खलनमुळे 29 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

संबंधित बातमी   केरळमध्ये अतिवृष्टीमुळे २९ जणांचा मृत्यू


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)