राहुल गांधींनी ट्विटरवरून नावासमोरचं ‘काँग्रेस अध्यक्ष’पद हटवलं

नवी दिल्ली : यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस खासदारांच्या बैठकीत पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. पण राजीनाम्यावर अडून बसलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं मन वळवण्याचे काँग्रेस नेत्यांचे सारे प्रयत्न फेल गेले.

त्यातच आज राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ‘काँग्रेस अध्यक्ष’ ही ओळख काढून टाकली आहे.

दरम्यान, यापूर्वीच राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या भूमिकेलिषयी स्पष्ट मतं व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते की, “मी अगोदरच काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता काँग्रेसच्या कार्यकारिणीनं लवकरात लवकर नवा अध्यक्ष ठरवण्यासाठी बैठक घ्यावी.”

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदासाठी ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता

राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यापूर्वी, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होतं. पण आता या निवडीत हंगामी अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा याचं नाव पुढे येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)