काही आठवड्यांत राहुल गांधी पंतप्रधान बनतील : स्टॅलिन

चेन्नई -काही आठवड्यांत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान बनतील. त्यांच्या हाती देश सुरक्षित राहील, असा विश्‍वास द्रमुकचे अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी बुधवारी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएने नागेरकोइलमधील सभेच्या माध्यमातून तामीळनाडूत प्रचाराचा नारळ फोडला. त्या सभेला राहुलही उपस्थित होते.

स्टॅलिन यांनी मागील वर्षाच्या अखेरीस विरोधकांच्या प्रस्तावित महाआघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल यांचे नाव पुढे केले होते. त्या भूमिकेवर ठाम राहत स्टॅलिन यांनी राहुल यांच्याविषयीचे भाकीत केले. राहुल यांच्याकडे पाहत ते म्हणाले, लवकरच तुमच्या हाती सत्ता येणार आहे. ती गरीब आणि सामान्य माणसासाठी असेल. तुम्ही नरेंद्र मोदी नव्हे तर राहुल गांधी असल्याने आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत. आताची निवडणूक म्हणजे मोदींना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठीचे युद्ध आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
मांझी यांनाही राहुल हवेत

बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी पाटण्यात पत्रकारांशी बोलताना राहुल पंतप्रधान बनावेत अशी इच्छा व्यक्त केली. मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा हा पक्ष बिहारच्या महाआघाडीचा घटक आहे. त्या महाआघाडीत कॉंग्रेस आणि राजदचा समावेश आहे. बिहारची महाआघाडी दिल्लीत जागावाटपाची चर्चा करणार आहे. त्या चर्चेत मांझी सहभागी होणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)