राहुल गांधीनी साधला मोदींवर निशाणा

महिला अत्याचारावर मोदी गप्प का ? केला सवाल

नवी दिल्ली – काॅग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज महिला सुरक्षेच्या मुद्दयावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही बालिकागृहात महिलांबाबत घडलेल्या घटनेबाबत मोदी गप्प का ? असा सवाल राहुल यांनी काॅग्रेसच्या महिला अधिकार मेळाव्याला संबोधित करताना उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या ४ वर्षामध्ये महिलांच्या विरोधात मोदी सरकारने जे काम केलं, ते काम गेल्या ३ हजार वर्षातही कोणी केलं नसेल. तसेच राहुल यांनी भाजपाचे वैचारिक मार्गदर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा पुरूषांची मक्तेदारी असलेले संघटना आहे. संघामध्ये महिलांना स्थान दिलं जात नाही. त्यामुळे महिलांसाठी जे काॅग्रेस करू शकतं ते संघ करू शकत नाही.

तसेच यावेळी त्यांनी ‘महिला आरक्षण विधेयक बिल’ पास करण्यासाठी काॅग्रेस पार्टी पूर्ण समर्थन देईल असा वादा केला. त्यांनी म्हटले की, जर मोदी सरकारने हे विधेयक आणले नाही तर काॅग्रेसची सत्ता येताच हे विधायक लगेच पास करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)