स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी मोदींकडून ‘सर्जिकल स्ट्राईक’चा वापर 

जयपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप लावताना, नरेंद्र मोदी यांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चे राजकारण केल्याचे म्हंटले आहे. जयपूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “ज्याप्रमाणे मोदी यांच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले, अशाच प्रकारची तीन सर्जिकल स्ट्राईक मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती मात्र या गोष्टी बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अशा मोहिमांबाबत गुप्तता पाळणे गरजेचे असताना देखील मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा उदोउदो करून त्याचे राजकारण केले.”

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी “बँकिंग क्षेत्रात सरकारने गंभीर स्वरूपाची उलथापालथ केली असून सरकारने आतापर्यंत १५ ते २० उद्योजकांचे कर्ज माफ केले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात २ लाख करोड एनपीए होता, आता  भाजपाच्या काळात तोच १२ लाख कोटींवर पोहोचला आहे.”  असा आरोप मोदीसरकारवर लावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)