#ICCWorldCup2019 : चौथ्या स्थानासाठी राहुल योग्य – सुनिल गावस्कर

मुंबई – चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येईल हा वादाचा मुद्दा आहे. माझ्या मते संघ निवड झाली असून या स्थानासाठी लोकेश राहुलहा योग्य उमेदवार असून सध्या आयपीएलमध्ये तो फॉर्ममध्ये असून यापुर्वीही त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, असे मत माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी मांडले.

यावेळी पुढे बोलताना गावस्कर म्हणाले, “सध्याच्या आयपीएलच्या हंगामात तो खूप मेहनतीने आणि संयमाने फलंदाजी करतो आहे. माझ्या मते सलामीच्या फलंदाजाला आपली जागा बदलून मधल्या फळीत फलंदाजीसाठी येण्यामध्ये फार समस्या येणार नाही. त्यामुळे त्याला या क्रमांकावर फलंदाजीस पाठवणे योग्य होईल.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)