राष्ट्रीय अंजिक्यपद कुस्ती स्पर्धा : राहुल आवारेने पटकावले सुवर्णपदक

संग्रहित छायाचित्र

गोंडा – उत्तरप्रदेश राज्यातील गोंडा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुण्याचा आणि सध्या रेल्वेचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या राहुल आवारेने वरिष्ठ गटात सुवर्णपदक पटकावले आहे.

राहुलने स्पर्धेतील 61 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत गोव्याच्या अभिमन्यू यादववर 10-0 अशी मात करत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. राहुलचे हे राष्ट्रीय स्पर्धेतील सातवे सुवर्णपदक ठरले.  राहुलने अंतिम फेरीपूर्वीच्या चारही लढतीत विजय मिळवला होता. राहुलने उपांत्य फेरीत सूरजला पराभुत करत अंतिम फेरी गाठली होती.

-Ads-

राहुलने 73 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग सातवे सुवर्णपदक पटकावले आहे. यासह तो वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग सात सुवर्णपदक जिंकणारा पहिला मल्ल ठरला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)