म्हणून मोदींनी भारतीय वायुदलच विक्रीस काढलं : राहुल गांधींचा घणाघाती आरोप 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल करारावरून जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी पंतप्रधानांवर गंभीर आरोप लावताना म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मित्र अनिल अंबानी यांच्या फायद्यासाठी भारतीय वायुदलाला अक्षरशः विक्रीस काढलं तसेच आपल्या मित्राला ३०,००० कोटींचा फायदा देण्यासाठी देशातील तरुणांचे भविष्य मातीस मिळवले.”

राहुल गांधी हे आज ‘युवा क्रांती यात्रे’च्या समारोप कार्यक्रमामध्ये बोलत होते. ते यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, “राफेल करारामध्ये घोटाळा झाला असल्याचे सत्य कोणीही लपवू शकणार नाही. लवकरच राफेलबाबतचे सत्य बाहेर पडेल.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलताना राहुल म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेमध्ये दीडतास बोलले मात्र राफेल बाबत प्रश्न विचारले असता मोदी नजर चोरायला लागले. राफेल घोटाळ्यामुळे पंतप्रधानांची रात्रीची झोप उडाली असून ते सत्य लपवण्यासाठी झटपट करत आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)