राहाता नगरपालिकेस 5 कोटी रूपये निधी मंजूर

मुंबई : राहाता नगरपालिकेस पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे पत्र ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांना देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार.

नगराध्यक्ष ममता पिपाडा, डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या पाठपुराव्याला यश

शिर्डी – आपण कार्यक्षम, कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आहात. जनतेच्या हिताच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने आग्रही असता. आपल्या हातून सदैव अशीच लोकसेवा घडावी म्हणून मी आपल्या मागणीनुसार राहाता नगरपालिकेला 5 कोटी रुपयांचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. त्याचे पत्र आपणास समक्ष देत असून आपले अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा, अशी भावना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. राजेंद्र पिपाडा यांना राहाता नगरपालिकेसाठी निधी वाटप करताना व्यक्‍त केली.

-Ads-

अर्थमंत्री मुनगंटीवार स्वत:च्या दालनात निधी मंजुरीचे पत्र डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्याकडे सुपूर्द केले. राहाता शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी नगराध्यक्ष ममता पिपाडा यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली असता त्या मागणीच्या अनुषंगाने विविध विकासकामे करण्यासाठी जुलै 2018 च्या पुरवणी अर्थसंकल्पात 5 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

राहाता नगरपालिका ही जिल्ह्यातील “क’ वर्ग पालिका आहे. शहराची सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 22 हजार 335 इतकी आहे. शहराचे क्षेत्रफळ 22.74 स्के.चौ.कि.मी. इतके आहे. त्या प्रमाणात शहरातील मालमत्ता संख्या 4 हजार 500 म्हणजे अत्यंतकमी आहे. त्यामुळे कर स्वरुपात व इतर मार्गाने पालिकेस उत्पन्न मिळवून इतक्‍या मोठ्या क्षेत्रफळावर विकासकामे करण्यास मर्यादा येतात. पालिकेला विविध शासकीय योजनांमध्ये नगरपालिका हिस्सा भरणे, शहरातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, बगीचा, दैनंदिन साफसफाई ही कामे करण्याकरीता उत्पन्नाचे स्त्रोत कमी असल्याने मर्यादा येतात. त्यामुळे राहाता शहरात विविध विकास कामे करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यांनी जुलै 2018 च्या पुरवणी अर्थसंकल्पात 5 कोटी रूपये निधी मंजूर केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)