‘नोटाबंदी-जीएसटी’मुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली : रघुनाम राजन

वॉशिंग्टन: नोटांबदी आणि जीएसटी यामुळेच मागील वर्षी भारताच्या आर्थिक विकास दरात घसरण झाली. तसेच सध्याचा भारताचा सात टक्के असलेला विकास दर हा देशाच्या गरजांसाठी पुरेसा नाही, असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ‘रघुराम राजन’ यांनी म्हटले आहे.

बर्कले येथील कॅलिफोर्निया विश्वविद्यालयात लोकांना संबोधित करताना ते बोलत होते. राजन यांनी म्हंटले की, ‘नोटाबंदी आणि जीएसटी लागू होण्यापूर्वी म्हणजेच मागील चार वर्षांपूर्वी (2012 ते 2016) भारताच्या विकास दरामध्ये वेगाने वाढ होत होती, मात्र त्यानंतर करण्यात आलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारताच्या विकास दरावर गंभीर परिणाम झाला. भारताचा विकास दर अशावेळेस कोसळला, जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था वाढत होती.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘भारतीय अर्थव्यवस्थेचा आलेख चढता असला तरीही देशातील रोजगाराच्या संधी वाढत नाहीयेत. गेल्या 25 वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असली तरी देशात बेरोजगार तरूणांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे सध्याचा सात टक्के विकास दर पूरेसा नाही. त्यासाठी रोजगारांची निर्मिती करणे आणि तरुणांना रोजगार पूरविणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपल्याला विकास दर वाढविण्याची अावश्यकता आहे. सध्याच्या विकास दरावर संतुष्ट राहणे आपल्याला चालणार नाही.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)