रघुलला एफएमएससीआयचा ‘अपकमिंग मोटरस्पोर्टस पर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार

मुंबई : जागतिक मोटरस्पोर्टसमध्ये भारताचा आघाडीच्या खेळाडुंचा गौरव एफएमएससीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सोमवारी करण्यात आला. चेन्नईच्या रघुल रंगासामीला अपकमिंग मोटरस्पोर्टस पर्सन ऑफ द ईयर पुरस्काराने गौरविण्यात आले.

25 वर्षीय रघुलने रेसरसाठी हे वर्ष कमालीचे चांगले राहिले. त्याने जे के टायर एफएमएससीआय राष्ट्रीय रेसिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत एलजीबी फॉर्म्युला 4 चे जेतेपद मिळवले. यासोबतच एमआरएफ एमएमएससी एफएमएससीआय इंडीयन राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये एफएफ 1600 गटात चमक दाखवली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला प्रतिष्ठेचा रेमंड गौतम सिंघनिया चषक मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एफएमएससीआयच्या या वार्षिक सोहळ्यात 61 विजेत्यांना गौरविण्यात आले.एफएमएससीआयचे माजी अध्यक्ष जी.आर. कार्तिकेयन (1981-82 आणि 1985-87)यांना भारतीय मोटरस्पोर्टसमधील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)