चेन्नई: देशभरामध्ये सध्या #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिला सोशल मीडियाद्वारे आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत असून यामध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे जोडली जात असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान आज प्रसिद्ध गायक रघु दीक्षित याच्यावर देखील सोशल मीडियाद्वारे लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. गायिका चिन्मयी श्रीपदाने आज एका निनावी महिलेची पोस्ट शेयर करत रघु दीक्षितला याबाबत खुलासा करण्याचे आव्हान केले होते. या पोस्टबरोबर तिने आपण सदर महिलेस ओळखत असून आपला तिच्यावर विश्वास असल्याचे देखील लिहिले आहे.
सदर अनोळखी महिलेने या घटनेची तपशीलवार माहिती दिली असून ती लिहिते की “मी रघु दीक्षितकडे एकदा एका गाण्याचे रोकोर्डिंग करण्यासाठी गेले होते त्यावेळी प्रथमतर त्याने आपल्या पत्नीची निंदा करणे सुरु केले त्यानंतर गाण्याच रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्याला मिठीत घेऊन ‘किस’ करण्यासाठी फोर्स केला, परंतु मी त्याला विरोध करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना देखील त्याने मला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु कसेबसे मी तिथून निसटले व त्याचे वर्तन आपल्याला आवडले नसल्याचे देखील त्याला मेसेज द्वारे सांगितले.”
याबाबत बोलताना रघु दीक्षित म्हणाले की “ज्या महिलेने ही घटना शेयर केली आहे तिला आपण ओळखत असून तिला त्यावेळी गैरसमजूत झाली होती मात्र आपण याबाबत तिची आधीही माफी मागितली असून आताही जाहीर माफी मागत आहे.”
More Raghu Dixit pic.twitter.com/5ZOucRdxlR
— Chinmayi Sripaada (@Chinmayi) October 10, 2018
From a co-singer, a friend. I believe her.
Raghu Dixit – Your #TimesUP pic.twitter.com/gzgwy6Io9e— Chinmayi Sripaada (@Chinmayi) October 10, 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0