विम्बल्डन – जागतिक क्रमवारीचा आधार न घेता विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धेचे संघटक मानांकने देत असतात अशी टीका फ्रेंच स्पर्धा जिंकणाऱ्या रॅफेल नदाल याने केली आहे. या स्पर्धेच्या मुख्य फेरीस सोमवारपासून प्रारंभ होत आहे.
या स्पर्धेसाठी नोवाक जोकोविच याला अग्रमानांकन देण्यात आले असून रॉजर फेडरर याला द्वितीय मानांकन मिळाले आहे. नदाल याला तिसरे मानांकन देण्यात आले आहे. नदालने फ्रेंच स्पर्धेत फेडरर याचा दणदणीत पराभव केला होता.