नवी दिल्ली – राफेल विमान खरेदी व्यवहार तपासणी संदर्भातील निकालाबाबत पुनरावलोकन विनंतीवर उद्या सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय जाहीर करणार आहे. मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांचे खंडपीठ राफेल पुनरावलोकन विनंत्यांवर उद्या निर्णय जाहीर करणार आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचा समावेश आहे.
A bench of Chief Justice Rajan Gogoi, Justice Sanjay Kishan Kaul and Justice KM Joseph will pronounce the judgement on Rafale review pleas tomorrow. https://t.co/GnJnDByhCA
— ANI (@ANI) April 9, 2019
राफेल विमान खरेदी व्यवहार तपासणीची मागणी संदर्भातील निकालाबाबत फेरविचाराची मागणी करणाऱ्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. गेल्या वर्षी 14 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहाराची तपासणी करण्याची मागणी फेटाळून लावली होती.
राफेल प्रकरणी त्वरित सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी केली होती. या याचिकांवरील फेरविचाराबरोबरच काही सरकारी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाला दिशाभूल करणारी माहिती दिल्याची याचिकाही दाखल करण्यात आली आहे.