मलकापूर येथे दोन गटात राडा

गाडी आडवी लावल्याच्या कारणावरून हाणामारी; संशयितांची धरपकड
कराड –
मलकापूर, ता. कराड येथे दोघांवर वार झाल्याची घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती. गाडी आडवी मारण्याच्या कारणावरून हा प्रकार झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.

दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर परिसरातील युवकांचा कराडमधील युवकांशी वाद झाला होता. यावरून त्यांच्यात धुसफूस सुरू होती. गुरुवारी रात्री कराडमधील काही युवक अहिल्यानगर परिसरात आले. त्यांनी दोन युवकांशी मारहाण करत त्यांच्यावर वार केले. भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या अन्य एका युवकावरही हल्ला झाल्याचे समजते. किरकोळ कारणावरून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सर्जेराव गायकवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वप्नील लोखंडे यांच्यासह पथकास पाचारण केले. पोलिसांनी या प्रकाराची माहिती घेत संशयितांची धरपकड केली. जखमींना खासगी रुग्णालयात हलवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)