औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडीचे नवनियुक्त खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरुन औरंगाबाद महापालिकेत चांगलाच राडा झाला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी विरोध केला. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून राजदंड पळवण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी गोंधळ घालणाऱ्या ‘एमआयएम’च्या सहा नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केले. सर्व नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन करीत मोठा गोंधळ घातला. सुरक्षा रक्षकांनाही दाद देत नसल्यामुळे शेवटी पोलिसांना सभागृहात पाचारण करण्याची वेळ आली. त्यातच महापौरांनी सभागृहाचे कामकाज तूर्त तहकूब केले आहे.