औरंगाबादेत रामदास आठवलेंच्या सभेत राडा

औरंगाबाद: ओरंगाबादमध्ये सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या सभेवेळी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी चक्क खुर्च्यांची फेकाफेक करून गोंधळ घातला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार रौप्यमहोत्सव दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमानिमित्त आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांच्या येथे सभा होतात. यावर्षी रामदास आठवलेंची आज विद्यापीठ गेट परिसरात सभा होती. सभेदरम्यान व्यासपीठावर एका स्थानिक नेत्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरला. त्यामुळे उपस्थितांपैकी एक गट संतापला आणि त्यांनी सभा उधळून टाकण्याचा प्रयत्न केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालत खुर्च्या देखील फेकल्या. या सगळ्या प्रकारामुळे विद्यापीठ गेट परिसरात काही वेळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरु झाला. गेल्यावर्षीही भीमा कोरेगावच्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभुमीवर रामदास आठवलेंच्या सभेत अशाच प्रकारचा गोंधळ झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)