महिला रेसर स्नेहा शर्मा मलेशियात दुसऱ्या स्थानी

सेपांग (मलेशिया)  – भारताची आघाडीची महिला रेसर स्नेहा शर्माने मलेशियातील सेपांग इंटरनॅशनल रेस सर्किट येथे झालेल्या एमएसएफ सीरिजमधील पहिल्या फेरीत चमक दाखवत दुसरे स्थान मिळवले. या स्पर्धेत सहभाग नोंदवणारी ती एकमेव भारतीय ड्रायव्हर होती. टीम डी व्ही मोटरस्पोर्टस्कडून तिने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत 70 कारची चार गटांत विभागणी करण्यात आली होती. प्रो, ऍडव्हान्स, इंटरमीडिएट व कॅज्युअल असे गट आहेत.

यावेळी बोलताना स्नेहाने सांगितले की, हा माझा पहिला आंतरराष्ट्रीय विजय असल्याने मी आनंदी आहे. मला ट्रॅकवर ड्रायव्हिंग करताना आनंद मिळत होता. फिनिश लाईनला येण्यापूर्वी दोन कार्सला मी ओव्हरटेक केले त्यामुळे मी दुसऱ्या स्थानी पोहोचले. कार चालवण्यासाठी कौशल्याचीही तितकीच गरज होती. आम्हाला गिअर बॉक्‍सच्या अडचणी आल्या होत्या.

मात्र, संघाने चांगली कामगिरी बजावल्यामुळे पोडीयम फिनिश करता आले, असेही स्नेहाने यावेळी सांगितले.
व्यवसायाने वैमानिक असलेल्या 27 वर्षीय स्नेहाने ऍडव्हान्स गटात अनेक आंतरराष्ट्रीय रेसर्सच्या उपस्थित 2:57.4 अशी वेळ नोंदवत चमक दाखवली. रेस वनमध्ये पहिले व रेस 2 मध्ये दुसरे स्थान मिळवल्याने त्यामुळे महिला कप अजिंक्‍यपद स्पर्धेत तिला दोन्ही स्पर्धा मिळून दुसरे स्थान मिळाले. तर, एकत्र ऍडव्हान्स गटात स्नेहाने सहावे स्थान मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)