राबडीदेवींच्या सुरक्षा जवानाची आत्महत्या

पाटणा – बिहारच्या माजी मुख्यमंत्री व राजदच्या नेत्या राबडी देवी यांच्या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सीआरपीएफच्या एका जवानाने आज स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. गिरीयाप्पा किरासूर असे या जवानाचे नाव असून तो 29 वर्षीय होता. तो सीआरपीएफच्या 122 बटालियन मध्ये कार्यरत होता. राबडीदेवी यांच्या सर्क्‍युलर रोडवरील निवासस्थानी तो तैनातीला होता. तो मुळचा कर्नाटकातील बागलकोटचा रहिवासी होता.

त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पण आत्महत्या करण्याच्या आदल्यादिवशी त्याचे त्याच्या पत्नीशी फोनवर कडाक्‍याचे भांडण झाले होते. त्यामुळे तो अस्वस्थ होता त्यातूनच त्याने हे कृत्य केले असावे असा अधिकाऱ्यांचा कयास आहे. त्याच्याकडे इस्त्रायली बनावटीची रायफल होती त्यातूनच त्याने स्वत:वर गोळी झाडली. ही रायफल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)