बॉलीवूडसह चित्रपटसृष्टीला काही वर्षांत एकापेक्षा एक हिट गाणे देणारे प्रसिद्ध रॅपर बादशाह आता लवकरच चित्रपटातून अभिनय क्षेत्रात डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. दिग्दर्शिका शिल्पी दासगुप्ता यांच्या आगामी चित्रपटात तो झळकणार आहे. यात सोनाक्षी सिन्हा, वरुण शर्मा, अन्नू कपूर, कुलभूषण खरबंदा आणि नादिरा बब्बर आदी कलाकारांची फौज आहे.
या चित्रपटाचे शूटिंग पंजाब येथे सुरू असून बादशाह लवकरच या टिमसोबत जाईन होणार आहे. या चित्रपटातील भूमिका ही बादशाहच्या ख-या जीवनाशी मिळती-जूळती आहे. या चित्रपटाविषयी बादशाह म्हणाला, यावर्षाच्या सुरूवातीला मी निर्माता म्हणूनही नवीन क्षेत्रात पर्दापण केले आहे. तसेच चित्रपटातील भूमिका माझ्यासाठी योग्य असल्याचा विश्वास निर्मात्यांनी मला दिला आहे. याशिवाय सोनाक्षीसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. कारण ती माझी एक चांगली मैत्रिण आहे.
चित्रपटाचे निर्माता भूषण कुमार हे बादशाहला विश्वास देत म्हणाले की, यापूर्वीही त्याने अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्रित काम केले आहे. जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली, तेव्हा या भूमिकेसाठी मला केवळ बादशाहच योग्य वाटला. या भूमिकेसाठी त्याने होकार दर्शविल्याने मी आनंदी आहे, असेही कुमार म्हणाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा