बायर्न म्युनिचला हरवून लिव्हरपूलने गाठली उपांत्यपूर्व फेरी

नवी दिल्ली – सादियो माअनेच्या दोन गोलमुळे लिव्हरपूलने बायर्न म्युनिचला 3-1 असे हरवून चॅम्पियन्स लीगच्या अंतिम आठ संघांत स्थान मिळवले. तीन आठवड्यांपूर्वी या दोन्ही संघातील पहिल्या फेरीतील सामना ड्रॉ झाला होता. दोन्ही संघाला त्यामध्ये गोल करण्यात अपयश आले होते. त्यामुळे या सामन्यातील निकालाला महत्त्व प्राप्त झाले होते. यात लिव्हरपूलने बाजी मारली.

यावेळी सादियोने 26 व्या मिनिटाला गोल केला तर त्यानंतर 39 व्या मिनिटाला लिव्हरपूलच्या ज्योएल माटिप याने स्वयंम गोल केल्यामुळे सामना 1-1 असा बरोबरीत आला. मध्यंतराला सामना बरोबरीतच होता. उत्तरार्धात मात्र वर्जिल वॉन डिक याने 69 व्या मिनिटाला गोल करून लिव्हरपूलला पुन्हा आघाडी मिळवून दिली. पहिला गोल नोंदवणाऱ्या सादियाने 84 व्या मिनिटाला दुसरा गोल डागून लिव्हरपूलचा विजय निश्‍चित केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)