येणारा काळ क्वांट फंड योजनांचा (भाग-१)

तंत्रज्ञानाने आपले अवघे जीवन व्यापून टाकले आहे. समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त वेळा घडणारी सर्वसाधारण गोष्ट शोधून काढण्यासाठी ठराविक पायऱ्यांमध्ये निश्चित केलेले नियम म्हणजेच संगणकीय प्रक्रियेतून अल्गोरिदमद्वारे शेअर ट्रेडिंगमधील अनेक गोष्टी अचूकपणे समजू शकतात. त्यासाठी प्रचंड आकडेवारीचा वापर करून एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे किंवा विकायचे याच निर्णय निश्चित केला जातो. या सगळ्या प्रक्रियेत शेअरच्या भावातील चढउतार, किती शेअरची उलाढाल झाली (व्हॉल्यूम), शेअरमागे होणारी कंपनीची कमाई, कंपनीची विक्री, नफा, वाढ अशा अनेक गोष्टींचा एकमेकांशी ताळमेळ घालून निष्कर्ष काढला जातो. अर्थात हे सगळे काम संगणकीय सॉफ्टवेअरद्वारे होते आणि त्यातून कुठल्या कंपन्यांचे शेअर खरेदी करायचे आणि कुठल्या कंपनीचे विकायचे याचा निर्णय घेतला जातो. यात मानवी हस्तक्षेप जवळपास नसतोच. अशा प्रकारे मोठ्या आकडेवारीचे विश्लेषण करून संगणकाद्वारे निर्णय घेऊन ज्या म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन केले जाते त्यांना क्वांटिटेटिव्ह किंवा क्वांट म्युच्युअल फंड असे म्हटले जाते.

येणारा काळ क्वांट फंड योजनांचा (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशातील आयसीआयसीआय म्युच्युअल फंड आणि डीएसपी म्युच्युअल फंड या दोन आघाडीच्या फंडांतर्फे क्वांट आधारीत योजनांविषयीचे प्रस्ताव तयार करून त्यांचा मसुदा मंजुरीसाठी सेबीकडे पाठवण्यात आला आहे. येत्या काळात क्वांट फंडांभोवतीच म्युच्युअल फंडांचा कारभार राहणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)