येणारा काळ क्वांट फंड योजनांचा (भाग-२)

येणारा काळ क्वांट फंड योजनांचा (भाग-१)

क्वांट फंडातील शेअरची निवड निव्वळ प्रचंड माहिती व आकडेवारीच्या विश्लेषणातून होत असल्याने त्यामध्ये त्रुटीला वाव कमी असतो. त्यामध्ये अतिशय अचूकता असते. फंडाच्या कामगिरीचा आढावा आणि काही प्रमाणात फिरवाफिरव इतकाच मानवी हस्तक्षेप त्यामध्ये असतो. यासाठी पुढील काळात फंड चालवणाऱ्या कंपन्या स्वतःची गुंतवणूक मॉडेल तयार करतील. त्यासाठी शेअर बाजारातील कंपन्यांचा नफा, मूल्यांकन, भविष्यातील संधी या सगळ्यांचे आकडेवारीसह आणि त्या शेअरच्या चढउताराच्या पॅटर्नच्या अभ्यासासह अनेक गोष्टींचा समावेश असेल. टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय) आणि इतर बदलांमुळे नेहमीसारखेच व्यवस्थापन असलेल्या म्यच्युअल फंडांना बेंचमार्क इंडेक्सला मागे टाकणे अवघड होईल, तेव्हा क्वांट फंडातील योजनांचे अस्तित्व जाणवू लागणार आहे. आपल्या शेअर बाजारातील व्यवहारांवर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो आणि अशा स्थितीत कुठल्यातरी बाजूला झुकणाऱा मानवी हस्तक्षेप पूर्णपणे बंद होऊन कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत काळाच्या कसोटीवर उतरलेल्या शेअर्सची निवड होऊ लागेल तेव्हा अर्थातच ते शेअर तुम्हांला मोठा परतावा देणारे ठरतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांमध्ये क्वांट फंडातील योजनांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मानवी पूर्वग्रहातून घेतले जाणारे निर्णय क्वांट फंड योजनांमध्ये पूर्णपणे बंद होतात. दर ४५ दिवसांनी कंपनीच्या कमाईतील वाढ, मूल्यांकन आणि किंमतीतील चढउतार यांसदर्भातील आकडेवारीचे सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषण होते. हे पूर्णपणे पुराव्याच्या आधारे चालणारे मॉडेल आहे. क्वांट आधारीत म्युच्युअल फंड योजनांना जगभर मल्टीफॅक्टर फंड म्हणून ओळखले जाते.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)