कतार ओपेकमधून बाहेर पडणार

दुबई: तेलसमृद्ध अरब देश कतारने तेल उत्पादक देशांची संघटना “ओपेक’मधून बाहेर पडण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. “ओपेक’वर असलेल्या सौदी अरेबियाच्या प्रभावातून मुक्‍त होऊन तेल उत्पादन वाढवण्यासाठी कतारने हा निर्णय घेतला आहे. कतारचे उर्जा राज्यमंत्री शाद शेरीदा अल काबी यांनी या निर्णयाची घोषणा केली. कतारने आपली नैसर्गिक गॅसची निर्यात वर्षाला 77 दशलक्ष टनांवरून 110 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कतारने तेलाचे उत्पादनही दिवसाला 4.8 दशलक्ष बॅरलवरून 6.5 दशलक्ष बॅरल पर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे, असे काबी यांनी सांगितले.

कतारच्या या भूमिकेमुळे “ओपेक’मधील सदस्य देशांवर तेल उत्पादन कमी करण्यासाठी येत असलेल्या दबावाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती 30 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरल्यावर 2016 मध्ये “ओपेक’ने तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. 1960 साली “ओपेक’ची स्थापना झाल्यापासून कतार या संघटनेचा सदस्य देश आहे. कतारच्या निर्णयावर “ओपेक’कडून कोणतीही प्रतिक्रिया त्वरित उपलब्ध होऊ शकली नाही.

कतारमधील लोकसंख्या 26 लाख इतकी आहे. 1971 साली स्वतंत्र झाल्यावर कतारच्या नोर्थ फिल्डजवळ तेलाचे मोठे साठे असल्याचे उघड झाले. त्या तेलाच्या साठ्याच्या आधारे कतार जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल उप्तादक देश बनला आहे. या तेलाच्या समृद्धीमुळे मालामाल झालेल्या कतारने 2022 च्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेसाठे यजमानपदही मिळवले आहे. जून 2017 मध्ये “ओपेक’मधील बहारीन, इजिप्त, सौदी अरेबिया आणि संयुक्‍त अरब अमिरातीने राजकीय कारणाने कतारवर बहिष्कार घालायला सुरुवात केली. या राजकारणापोटीच कतारने “ओपेक’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)