कॅडेन्स, वेंगसरकर अकादमी संघांची आगेकूच

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा

पुणे – कॅडेन्स संघाने पुना क्‍लब संघाचा तर दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने क्रिकेट मास्टर्स अकादमी संघाचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत आगेकुच केली.

-Ads-

पुना क्‍लब मौदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीने 45 षटकांत 3 बाद 363 धावांची मजल मारली. यात शार्दुल विनोदे 118 चेंडूत 150 धावा, वैभव आगमने 113 चेंडूत 133 धावा करून संघाला 363 धावांचे आव्हान उभे करून दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना क्रिकेट मास्टर्स अकादमी संघ 45 षटकांत 8 बाद 139 धावांचीच मजल मारता आली. यात साहिल अभंगने 94 धावांची एकाकी लढत दिली.

मात्र, दुसऱ्या बाजुने त्याला अपेक्षित साथ न मिळाल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी, डिव्हीसीएकडून ओंकार राजपूत आणि कबीर भट्टाचारीने 2 गडी बाद केले. तर, शर्व मते, साहिल सावंत, भार्गव महाजनयांनी प्रत्येकी एक गडी बाद करत त्यांना सुरेख साथ दिली. यावेळी आपल्या शतकी खेळीसाठी शार्दुल विनोदेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी वैभव आगम व शार्दुल विनोदे यांनी 222 चेंडूत 309 धावांची दमदार भागीदारी केली.

तर, दुसऱ्या सामन्यात प्रथमेश थिटेयाने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कॅडेन्स संघाने पूना क्‍लबचा 10 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पूना क्‍लब संघाने 45 षटकांत 9 बाद 102 धावा केल्या. यात हर्षवर्धन पाटील 36, ओम माळी नाबाद 24 यांनी संघाला शंभरी गाठुन दिली. हे आव्हान कॅडेन्स संघाने 15 षटकांत एकही गडी न गमावता 105 धावा करत पूर्ण केले.

यात वेदांत जगदाळे नाबाद 26, अरशीन कुलकर्णी नाबाद 72 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी कॅडेन्सच्या प्रथमेश थिटेने केवळ सात धावात 5 गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिल्याने त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

संक्षिप्त धावफलक : साखळी फेरी :

पूना क्‍लब: 45 षटकांत 9 बाद 102 (हर्षवर्धन पाटील 36, ओम माळी नाबाद 24, प्रथमेश थिटे 5-7, दिग्विजय पाटील 2-7, अरशीन कुलकर्णी 1-26) पराभूत वि. कॅडेन्स: 15 षटकांत बिनबाद 105 (वेदांत जगदाळे नाबाद 26, अरशीन कुलकर्णी नाबाद 72) सामनावीर-प्रथमेश थिटे.

वेंगसरकर क्रिकेट अकादमी : 45 षटकांत 3 बाद 363 (वैभव आगम 133, शार्दुल विनोदे 150, आर्यन पवार 2-106, पार्थ बोथरे 1-83) वि.वि. क्रिकेट मास्टर्स अकादमी: 45 षटकांत 8 बाद 139 (साहिल अभंग 94, पार्थ कोमन नाबाद 8, ओंकार राजपूत 2-24, कबीर भट्टाचारी 2-20, शर्व मते 1-20, साहिल सावंत 1-24, भार्गव महाजन 1-38).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)