प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर 6 मार्चला सुनावणी 

मुंबई  – माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिन अर्जाची सुनावणी 6 मार्चपर्यंत तहकूब ठेवण्यात आली.न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी सुनावणी निश्‍चित करताना तेलतुंबडे यांना अटक करण्याची गरज भासल्यास 1 लाख रुपयाच्या वैयक्तीक हमीवर सुटका करण्याचे निर्देश कायम ठेवले.

पुणे पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपाखाली दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र 11 फेब्रुवारीपर्यंत तेलतुंबडे यांना अटकेपासुन दिलासा दिला. त्यानंतर पुणे कनिष्ठ न्यायालयने चार दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या वतीने ऍड. मिहिर देसाई यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. हा अर्ज न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणीसाठी घेण्यात आला. न्यायालयाने अर्जाची सुनावणी 6 मार्चला निश्‍चित केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)