सिंधूची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप

नवी दिल्ली – ऑलिम्पिक आणि जागतिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुन्हा झेप घेतली असून दुसऱ्या स्थानावर पुन्हा मुसंडी मारली आहे. सध्या पॅरिसमध्ये फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत खेळत असलेल्या सिंधूने तडाखेबाज खेळाचे प्रदर्शन करत उपान्त्यफेरीत धडक मारली असून तिच्या याच कामगिरीमुळे तिने एका स्थानाने आगेकूच केली आहे. तर मानांकनात सध्या चायनीज तैपेईची ताय झू यिंग अव्वल स्थानावर आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सिंधूने एका आठवडयाकरिता जागतिक क्रमवारीतील दुसरे स्थान मिळवले होते. त्यानंतर तिची घसरण झाली होती. सप्टेंबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी पुन्हा हे स्थान मिळवले होते. त्यानंतर ती तिसऱ्या स्थानावर होती. गेल्या आठवडयात डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या सायना नेहवालने एका स्थानाने आगेकूच केली असून, ती आता जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुरुष एकेरीच्या क्रमवारीत किदम्बी श्रीकांतने आपले सहावे स्थान कायम राखले आहे, तर समीर वर्माने पाच स्थानांनी आगेकूच करताना 18वे स्थान गाठले आहे. डेन्मार्क आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार घेणाऱ्या एच. एस. प्रणॉयची दोन स्थानांनी घसरण झाली असून, तो 17व्या स्थानावर आहे. तर, बी. साईप्रणीत 26व्या स्थानावर असून, सौरभ वर्माने दोन स्थानांनी आगेकूच करताना 48वे स्थान गाठले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)