महाविद्यालयात “पुरुषोत्तम’ची जय्यत तयारी

पुणे – महाविद्यालयीन नाट्यवर्तुळात मानाची समजली जाणारी पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकीका स्पर्धा 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये सध्या पुरुषोत्तमचे वारे वाहताना दिसून येत आहे. स्पर्धेच्या तयारीत गुंतलेले आणि करंडक आपल्याच महाविद्यालयात यायला हवा, यासाठी विद्यार्थ्यांकडून जोमाने नाटकांचा सराव सुरू आहे. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत एकांकिका सादर करण्याची संधी मिळावी यासाठी दरवर्षीच अनेक नवीन महाविद्यालये नशीब आजमावत असतात. मात्र, प्रवेशाच्या नियमांमुळे स्पर्धेसाठी निवडले जाण्याचे भाग्य सर्वांच्याच वाट्याला येत नाही. त्यामुळे नेहमीच्या संघांसोबत चिठ्ठ्यांद्वारे निवडले गेलेले अवघे काही संघच नवे असतात. तर, काही महाविद्यालय वर्षानुवर्षे ही पुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी होत आसतात.

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात आजवर उत्तमोत्तम कलाकार, संगीतकार, गायक, वादक दिले. पुण्याला कलाकार निर्माण करणारी भट्टी म्हटले तरी वावग ठरणार नाही. असेच कलाकार घडविणारे एक व्यासपीठ म्हणजे पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकीका स्पर्धा. या स्पर्धेतून मराठीतील अनेक कलाकार पुढे आले आहेत. सुबोध भावे, अमेय वाघ यांसारख्ये कलाकार येथेच घडले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होऊन करंडक जिंकण्यासाठी तरुणाई उत्सुक असते. यावर्षी सामाजिक संदेश देणारी एकांकीका सादर करण्याचे काही महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी ठरवले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही अंतिम फेरीतपर्यंत पोहोचलो होतो. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. जोमाने नाटकाची तयारी करत आहोत. यावर्षी आम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहोत. काही वैचारीक दृष्टिकोणातून एक नव नाटक सादर करणार आहोत.
– स.प. महाविद्यालय टीम


बीएमसीसी महाविद्यालयाने अनेकदा पुरुषोत्तम करंडकमध्ये बाजी मारली आहे. मागच्या वर्षीही या महाविद्यालयाला संजीव करंडक मिळाला होता. त्यामुळे साहजिकच लोकांना आमच्याकडून आपेक्षा आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. त्यादृष्टीने उत्तम प्रयोग सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहो. अनेकजण यावर्षी नवीन आहेत. त्यांना सांभाळून घेत त्याचबरोबर करंडक बीएमसीसीकडे आणण्यासाठी जय्यत तयारी करत आहोत.
– बीएमसीसी महाविद्यालय टीम


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)