सोमवारपासून पुरुषोत्तमचा थरार

पुणे – नाट्यक्षेत्रात मानाची समजली जाणारी पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे (पुणे केंद्र) वेळापत्रक नुकतेच “फेसबुक’च्या माध्यमातून जाहीर करण्यात आले.

यंदा 54 वे वर्ष साजरे करणाऱ्या या स्पर्धेत पहिल्यांदाच हा आधुनिक तंत्राचा उपयोग करून प्राथमिक फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. भरत नाट्य मंदिर येथे बावधनच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या “झुरळाख्यान’ या एकांकिकेने स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. यंदा 51 संघांचा समावेश असणार आहे. पहिली एकांकिका सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. रंगकर्मी मानसी मागीकर, संजय पेंडसे आणि विनय कुलकर्णी हे प्राथमिक फेरीचे परीक्षक असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)